विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्मारकास केले अभिवादन
पुण्यातील शनिवार पेठेतील आयडील इंग्लिश स्कूलमधील ५० विद्यार्थी व शिक्षकांनी क्रांतिकारकर कट्टा येथील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक स्मारकास अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज, मशाली हाती घेत ‘इंकलाब झिंदाबाद', ‘भारत माता की जय', ‘भास्कर कर्णिक अमर रहे' अशा घोषणा दिल्या.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष पियूष शहा यांनी क्रांतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांनी शाह यांच्याकडून जाणून घेतली. ‘सरफरोशी कि तमन्ना आज हमारे दिल मे हैं' हे गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.
या प्रसंगी ट्रस्टचे नरेंद्र व्यास, अशोक पांड्या, आयडियल इंग्लिश स्कूलमधील प्राथमिक व माध्यमिक विभागातील रंजना आहेर, संगीता म्हस्के, कल्पना शेरे, सारिका निगडे, ज्योती पांगारकर, नामदेव अंतरकर उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.