पुणे-सातारा रस्त्यावर विचित्र अपघात, बसच्या चाकाने उडालेला दगड शिरला कारच्या काचेतून आत

पुणे-सातारा रस्त्यावर विचित्र अपघात झाला आहे. पीएमपीएमएल बसच्या चाकाखाली आलेला भलामोठा दगड उडून उभ्या असलेल्या कारची काच फोडून आत गेला. यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. कार चालकाने प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने मोठी हानी टळली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 25 May 2023
  • 12:30 pm
पुणे-सातारा रस्त्यावर विचित्र अपघात

पुणे-सातारा रस्त्यावर विचित्र अपघात

अपघातानंतर कार चालक आणि पीएमपी कर्मचारी भिडले

पुणे-सातारा रस्त्यावर विचित्र अपघात झाला आहे. पीएमपीएमएल बसच्या चाकाखाली आलेला भलामोठा दगड उडून उभ्या असलेल्या कारची काच फोडून आत गेला. यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. कार चालकाने प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने मोठी हानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथील चौकातील सिग्नलवर नेक्सॉन कार उभी होती. यावेळी बीआरटी मार्गातून पीएमपीएमएल बस जात होती. यावेळी बसच्या चाकाखाली मोठा दगड आला. दगड चाकाखाली आल्यामुळे तो उडला आणि कारच्या ड्रायव्हर साईडची काच फोडून आत गेला.

चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवीतहानी टळली. या घटनेनंतर पीएमपी कर्मचारी आणि कार मालक यांच्या जोरदार भांडणे सुरू झाली होती. तसेच अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळाताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest