कोंढव्यात विचित्र अपघात; स्कूल बस, ट्रक, टिप्पर एकमेकांवर आदळले
पुण्यातील कोंढवा स्मशानभूमी जवळ ४ ते ५ वाहनांचा विचित्र अपघात असून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस, ट्रक, टिप्पर आणि इतर वाहने एकमेकांवर आदळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर ३ ते ४ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
गुरूवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कोंढवा बुद्रुक स्मशानभूमीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने स्कूल बससह दोन ते तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात १ एकाचा मृत्यू झाला असून ३ ते ४ जण जखमी झाले.
अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.