प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, गुवाहाटी ते पुणे विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे धावणार

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गुवाहाटी ते पुणे विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी वन–वे ट्रीप धावणार आहे. ही रेल्वे गाडी २६ मे रोजी संध्याकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी गुवाहाटीवरून सुटणार आहे. तर २८ मे रोजी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पुण्यात पोहोचणार आहे.

विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे

गुवाहाटीवरून शुक्रवारी रेल्वे सुटणार

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गुवाहाटी ते पुणे विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस (superfast express) गाडी वन–वे ट्रीप धावणार आहे. ही रेल्वे (train) गाडी २६ मे रोजी संध्याकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी गुवाहाटीवरून (Guwahati) सुटणार आहे. तर २८ मे रोजी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पुण्यात पोहोचणार आहे.

प्रवाशांची मागणीवर आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन गाडी क्र. 05650 ही गुवाहाटी ते पुणे विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी वन –वे ट्रीप चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही रेल्वे गुवाहाटी स्थानकाहून २६ मे रोजी संध्याकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे.

त्यानंतर  पुढे कामाख्या, बरपेटा रोड, न्यू  बोंगाईगांव, न्यू  कूचबेहार, न्यू जलपाईगुळी, किसनगंज, कटीहार, बरौनी जं., हाजीपूर जं., पटलीपुत्र, पं. दीनदयाल उपाध्याय, मिर्जापुर, प्रयागराज, सतना, कटनी, जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसावल जं, मानमाड जं., कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉडलाइन मार्गे पुण्याला (बुधवारी) संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पोहचणार आहे.

या गाडीत २ गार्ड कम लगेज, ५ स्लीपर, ३ एसी-१, ९ जनरल असे १७ डब्बे असणार आहेत. तसेच प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना नियम पाळून प्रवास करावा आणि आपला प्रवाश सुरक्षित करावा, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story