पुणे : ‘डीजे’वाले बाबू, ‘प्रेशर मिड’वाल तर खबरदार

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध गणेश मंडळांकडून ‘डीजे’ लावले जातात. स्पीकरच्या भिंती उभ्या करून कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली जातात. त्यामुळे रहिवासी भागातील नागरिक, वाहनचालक, रुग्णालये, शाळा, महविद्यालये आदींना त्रास होतो.

पुणे : ‘डीजे’वाले बाबू, ‘प्रेशर मिड’वाल तर खबरदार

साहित्य जप्त करून गुन्हे होणार दाखल, िवसर्जन िमरवणुकीच्या पार्श्वभूिमवर पोलिसांचा पुन्हा इशारा

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध गणेश मंडळांकडून ‘डीजे’ लावले जातात. स्पीकरच्या भिंती उभ्या करून कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली जातात. त्यामुळे रहिवासी भागातील नागरिक, वाहनचालक, रुग्णालये, शाळा, महविद्यालये आदींना त्रास होतो. तसेच, या स्पीकर्समधून मोठा आवाज येण्याकरिता ‘प्रेशर मिड’ नावाचे यंत्र वापरले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होते. तसेच, आरोग्याचे प्रश्नदेखील निर्माण होतात. हे उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरल्यास ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादार, तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा हाताळणाऱ्यांविरुद्ध (डीजे) कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीची तयारी अनेक मंडळांनी सुरू केली आहे. विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा, तसेच डोळे दीपवणारे लेझर झोत वापरल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ध्वनिवर्धक यंत्रणेत ‘प्रेशर मिड’ उपकरणाचा वापर केला जातो. कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होते. त्याचे मानवी शरीरावर घातक परिणाम होतात. ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालय, तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरणारे डीजे, तसेच ध्वनिवर्धक पुरवठादारांविरुद्ध कारवाई करण्यात येतील. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांनी आदेशात म्हटले आहे.

विनापरवानगी ड्रोन उडवल्यास कारवाई

ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीत ड्रोन कॅमेरा वापरणाऱ्यांनी विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे अर्ज करावेत. परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. विनापरवानगी ड्रोन वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या सूचना शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘लेझर’ वापरणाऱ्यांना देखील इशारा

गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. या लेझरच्या घातक झोतांमुळे अनेकांच्या डोळ्यांना त्रास झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. कोल्हापूरमध्ये तर लेझर झोतांमुळे तिघांच्या डोळ्यांना इजा पोहोचल्याची घटना नुकतीच घडली होती. विसर्जन मिरवणुकीत लेझर झोतांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध हडपसर पोलिसांकडून नुकतेच गुन्हे दाखल करण्यात आले.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest