Pune Traffic Update : महत्वाची बातमी : गणपती विसर्जनासाठी पुण्यातील मुख्य १७ रस्ते राहणार बंद

पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य १७ रस्ते बंद राहणार आहेत. मध्यवर्ती भागातील हे १७ रस्ते मिरवणूक कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहेत.

Pune Traffic Update

Pune Traffic:महत्वाची बातमी : गणपती विसर्जनासाठी पुण्यातील मुख्य १७ रस्ते राहणार बंद

पुणे : पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य १७ रस्ते बंद राहणार आहेत. मध्यवर्ती भागातील हे १७ रस्ते मिरवणूक कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहेत.  मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत. पुणे पोलिसांकडून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Pune Traffic )

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरु होणार आहे. त्यामुळे मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest