पुणे-नाशिक महामार्गावर शिवनेरी बसला अपघात, १४ प्रवाशी किरकोळ जखमी
दुचाकीस्वाराला वाचविताना विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना शिवनेरी बस कंटेनरला धडकल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात शिवनेऱी बसमधील १४ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवात यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवनेरी बस पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात होती. यावेळी नारायणगाव बायपासला समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवनेरी चालकाने बस विरुद्ध दिशेला नेली. मात्र, विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना कंटेनर आणि शिवनेरी बसचा अपघात झाला.
या अपघातात १४ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातग्रस्त बसचे दरवाजे अचानक लॉक झाल्याने समोरील काच फोडुन प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघाताचा मोठा अनर्थ टळल्याची भावना काही प्रवाशांनी व्यक्त केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.