सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेना कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर शिदे-फडणवीस सरकार बचावले आहे. तसेच अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला आहे.
राज्यभरातील भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत करण्यात येत आहे. पुण्यातही कार्यकर्ते रस्त्यावर उतरून जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर सारसबागेतील शिवसेना मुख्य पक्ष कार्यालयाजवळ असणाऱ्या बाळासाहेब कलादालनासमोर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष करण्यात आला आहे.
शिवसेना पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे तसेच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक देखील जल्लोषात सामिल झाले होते. ढोल ताशाच्या वादनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी या जल्लोषात सहभाग घेतला. यावेळी मोठ्या घोषणाबाजी करत त्यांनी आनंद साजरा केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.