श्री कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शाही दसऱ्याचे आयोजन
पुणे : विजयादशमीच्या निम्मित श्री कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पारंपरिक शस्त्रपूजन व सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने शस्त्रे पूजण्यात आली. विधिवत पूजा अर्चा तसेच शमीपूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. लाल महाल परिसरातील सात मंडळे एकत्र येऊन गेली चार वर्ष हा कार्यक्रम करत आहेत.
सकाळी समितीच्या वतीने अजय शिंदे यांनी संकलित केलेल्या दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्रंबकेश्वर प्रतिष्ठानच्या कलाकारांनी मर्दानी खेळ सादर केले. संध्याकाळी शाही दसऱ्याचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, पुणे शहर पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, परिमंडल १ चे उपयुक्त संदीपसिंह गिल, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडप्पा, सिने अभिनेते समीर धर्माधिकारी, अजय पुरकर इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे, स्वराज्य सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, समीर पोतनीस, विनायकराव रणवरे, कर्नल प्रसाद पुरोहित, अशोक राव पलांडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महेश मोळावडे, पुष्कर तुळजापूरकर, जतिन पांडे सयाजी शेंडकर, अविनाश वाडकर, दिलीप कदम, विजय शेलार, नागेश बांदल व समितीच्या कार्यकर्त्यांनी केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.