संग्रहित छायाचित्र
पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिस तपास सुरु होता. दरम्यान, धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार योगेश टिळेकरांच्या मामाची हत्या मामीनेच म्हणजेच सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने केली असल्याची माहिती उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून खून घडवून आणल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी मोहिनी वाघ यांना अटक करण्यात आली आहे.
या हत्येप्रकरणी, आतिश जाधव, पवन श्यामकुमार शर्मा (वय 30, रा. शांतीनगर, धुळे), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 32, रा. अनुसया पार्क, वाघोली), अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे यापूर्वी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
आरोपी अक्षय हरीश जावळकर हा पूर्वी सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु म्हणून राहत होता. यादरम्यान वाघ यांची पत्नी मोहिनी आणि भाडेकरु यांच्याच जवळीक निर्माण झाली. त्यांच अफेअर सरु झालं. सतीश यांनी आपल्या पत्नीचे भाडेकरुसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. हे मोहिनी यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव रचला अन् पाच लाखाची सुपारी दिली. ये तिने अक्षयकडे दिले होते. त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती.
तसेच, संपत्तीवरुनही वाघ दांपत्यांमध्ये वाद असल्याचे समजते. सतीश वाघ यांच्याकडे जो अर्थिक व्यवहार होता तो मोहिनी यांना स्वतःकडे हवा होता.सतीश वाघ तिला खर्चासाठी पैसे देखील देत नव्हते. यामुळे सुरुवातीला मोहिनीने अक्षयला पती सतीशला गंभीर जखमी करून ते अंथरुणाला खिळून पडतील असे काहीतरी कर, असे सांगितले होतं. त्याचबरोबर मोहिनीने अक्षयला तू जर असं केलं नाही तर आपल्याबद्दल माझ्या नवऱ्याला सांगेन मग तो तुझे काय हाल करेल हे बघ, अशी धमकी दिल्याची माहिती माहिती आहे. यामुळे अक्षय दबावाखाली होता.
त्यानंतर त्याने कट रचत आरोपींशी संगनमताने सतीश वाघ यांचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर काही वेळातच सतीश यांची हत्या केली त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.