भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणाचा उलगडा अखेर झाला आहे. वाघ यांची पत्नी म्हणजेच मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. पतीची हत्या ही पैशाच्या आणि अनैतिक संबंधातून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता. मोहिनी वाघ या 10 वर्षांनी लहान असणाऱ्या भाडेकरुच्या प्रेमात होत्या त्या दोघांच्या प्रेमात सतीश वाघ अडथळा ठरत होते म्हणून मोहिनी वाघ यांनी त्यांचा काटा काढला. तर हा भाडेकरु नेमका होता तरी कोण? हे जाणून घेऊ.
मोहिनी वाघ जवळपास 10 वर्षांनी लहान असणाऱ्या भाडेकरुच्या प्रेमात
अक्षय हरीश जावळकर असं वाघ यांच्या भाडेकरुचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय हरीश जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु म्हणून राहत होता. यादरम्यान वाघ यांची पत्नी मोहिनी आणि भाडेकरु यांच्याच जवळीक निर्माण झाली. त्यांच अफेअर सरु झालं.
पोलिसांच्या माहितीनुसार 8 वर्षांपासून अक्षय आणि मोहिनी यांचं अफेअर सुरु होतं. अक्षयचं कुटुंब 2001 मध्ये सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु म्हणून राहायला आले. आई,वडील आणि अक्षय तिघे जण सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु होते. अक्षयच्या वडिलांचा भेळचा, वडापावचा गाडा आहे, तिथेच अक्षयही काम करतो.
काही कालावधीनंतर सतीश वाघ यांना पत्नी मोहिनी आणि भाडेकरु अक्षयचा संशय आला. अक्षयच्या कुटुंबाने सतीश वाघ यांची खोली सोडून दुसरीकडे राहायला गेले. मात्र, अक्षयचं वाघ यांच्या घरी येणे-जाणे सुरुच होतं. सतीश वाघ यांचा मुलगा आणि अक्षय हे मित्र असल्याचे समजते.
मोहिनी वाघ आणि भाडेकरु अक्षय जावळकर यांच्यात जवळीक कधी निर्माण झाली
मिळालेल्या माहितीनुसार, मात्र अक्षय जावळकर जेव्हा 21 वर्षांचा झाला तेव्हा 2013 मध्ये त्याचे आणि त्यावेळी 37 वर्षांच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. अक्षयने सिव्हिल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतलं आहे. अशातच, 2016 ला अक्षयचे लग्न करायचे ठरले. त्यानंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले.
अक्षयचे लग्न झाले तरी ही त्या दोघांमध्ये संबंध सुरुच होते. सतीश वाघ यांना समजल्यावर त्यांच्याच वादाची ठिणगी पडली. प्रेमात अडथळा आल्याने मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असं तिला वाटलं आणि 5 लाखाची सुपारी देत अक्षयच्या साथीने सतीश वाघ यांची हत्या केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.