संग्रहित छायाचित्र
पुणे: (Pune)दिवस भरण्यासाठी सकाळच्या सत्रात पीएमपीचे (PMP) चालक वाहक पहाटे तीन वाजताच डेपोवर पोहचतात. मात्र बस उपलब्ध नसल्याने आज कामावर येऊ नका, असे सकाळी ९ वजता सांगितले जाते. त्यामुळे पीएमपीच्या चालक- वाहकांना निराश होऊन पुन्हा घरी परतण्याची वेळ येत असल्याचे समोर आले आहे. (Pune News)
पीएममपीकडून पुणेकरांना बससेवा पुरवण्यात येते. पहाटे ४ वाजता पहिली बस डेपोतून बाहेर पडते. काम मिळावे यासाठी चालक आणि वाहक पहाटे तीन वाजताच डेपोमध्ये हजर होतात. त्याप्रमाणे बस ऊपलब्ध करुन दिल्या जातात. हजर झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना काम मिळणे अपेक्षित आहे. मात्र Vehical traking device बस मद्ये बसविलेले नाही. त्यामुळे आरटीओकडून बसचे पासिंग केले जात नाही. परिणामी बस मार्गावर आणली जात नाही. त्यामुळे कामगार अधिक आणि मार्गावरील बसची संख्या कमी अशी अवस्था झाली आहे. एकीकडे रजा घेतली म्हणून प्रशासनाकडून थेट कारवाई करण्यात येत. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे कामावर हजर होऊनही काम मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील एका डेपोवर १० वाहक आणि १० चालकांना बस नसल्याचे सकाळी ९ वाजता सांगण्यात आले.
तर काहींना दुसऱ्या डेपोत बस उपलब्ध आहे. तिथे जाऊन तूम्ही कामावर हजर व्हा. असे सांगण्यात आले. मात्र एका डेपोतून दुसऱ्या डेपोमध्ये जाण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यानंतर आठ तासांची ड्युटी याचा विचार केला तर रात्रीचे १० वाजतील. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता डेपो मध्ये हजर व्हावे लागणार आहे. या सर्व धावपळीत झोप कधी होणार असा प्रश्न आहे. याने आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका आहे. आजारी पडले आणि रजा मागितली तर पुन्हा कारवाईची टांगती तलवार असणार आहे. असे चालक वाहकांनी सांगितले.