शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर
पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) सोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना आणखी एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी पोलीस कोठडी आणखी एक दिवस वाढवण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मंजूर केली आहे.
कुरूळकर यांच्या चौकशीदरम्यान एटीएसकडून मोबाईल जप्त करण्यात आला होता. एटीएने तो मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवाल होता. माञ संबंधित मोबाईल फोन अनलॉक झाला नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा हा मोबाईल फोन एटीएसने ताब्यात घेतला असून तो अनलॉक करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, त्यात मिळालेली संबंधित माहिती अद्यापही तपासायची बाकी आहे. त्यामुळे, कुरूळकर यांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर मोबाईलमधील माहिती तपासायची असून त्यासाठी कुरूळकरांना आणखी एक दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
यावेळी कुरूळकर आणि एटीएस या दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तीवाद झाला. हा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कुरूळकर यांची पुन्हा एकदा एक दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, प्रदीप कुरुलकर यांना एटीएस अधिकार्यांनी ४ मे रोजी पाकिस्तानस्थित गुप्तचर यंत्रणेशी संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.