दगडूशेठ मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा
संकष्टी चतुर्थी निमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिरात भाविकांची गर्दी मोठी गर्दी केली आहे. बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मंदिरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दगडूशेठ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. यावेळी देखिल संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. संकष्टी चतुर्थी निमित्त दगडुशेठ मंदीरात पहाटे चार वाजता विशेष अभिषेक पार पडला.
तसेच सकाळी सात वाजता गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि मानाची आरती करण्यात आली. त्यानंतर दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेवून मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासन देखील सज्ज झाले आहे. सध्या मंदिरात प्रचंड गर्दी असून आज दिवसभर लाखो भाविक दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेणार आहेत.