Vande Bharat Express
वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळल्यानंतर आता वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस लवकरच महाराष्ट्रात धावणार आहे. विशेष म्हणजे नागपूर आणि, पुणे, मुंबईच्या प्रवाशांना याचा लाभ सर्वातआधी मिळणार आहे.
देशातील सर्वात हायस्पीड वंदे भारत ट्रेनने नुतकेच शतक पूर्ण केले असून प्रवाशांनाही या ट्रेनची भुरळ पडली आहे. देशातील लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळं आता रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या वंदे भारत स्लीपर सुरु करण्याचे ठरवलं आहे.
कोलकाता ते दिल्ली, नागपूर ते मुंबई अशा मार्गावर ही स्लीपर वंदे भारत धावणार आहे. तर, महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत स्लीपर नागपूर ते मुंबई, पुणे दरम्यान धावणार आहे. दरम्यान, अद्याप या स्लीपर ट्रेनचे भाडे किंवा दरपत्रक जाहीर झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये 16 कोच असणार असून ताशी 140 ते 160 किमी वेगाने ही ट्रेन धावणार आहे. त्यामुळं प्रवाशांना आरामदायी प्रवासचा आनंद लुटता येणार आहे.
मध्य रेल्वेने एक प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करत नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई दरम्यान स्लीपर वंदे भारतची मागणी केल्याची माहिती नागपूरचे डी.आर.एम विनायक गर्ग यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या नागपूरातून नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-इंदौर आणि नागपूर भोपाळ अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.