Pune: “जमत नसेल तर स्पष्ट सांगा”असं अजित पवारांनी पुणे पोलिसांना खडसावताच मुख्यमंत्र्यांनी घेतली बचावात्मक भूमिका

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 10 Jan 2025
  • 10:49 am
Ajit Pawar, Ajit Pawar Angry on Police, Pune Woman stabbed by colleague, high crime rate Pune, Pune crime rate increases, Devendra Fadnavis, अजित पवार, पुणे महिलेला सहकाऱ्याने भोसकले, उच्च गुन्हेगारीचे प्रमाण पुणे, पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, देवेंद्र फडणवीस

Ajit Pawar Angry on Police

पुण्यात दोन दिवसांपूर्वी आयटी कंपनीतील 28 वर्षीय तरुणीचा हत्या झाली. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. सर्व घडामोडींमुळं पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हाच मुद्दा हाती घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त केलीय. 'पोलीस अधिकाऱ्यांना जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं आम्ही इतर चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करु असा' इशारा पवारांनी यावेळी पोलिस प्रशासनाला दिला. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

अलीकडच्या काळात पुण्यात खून, दरोडे, खंडणी, हिट अँड रनच्या घटना वाढल्या आहेत. अनेक गुन्हेगारी टोळ्या या शहरात सक्रीय आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

 

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल प्रसारमाध्यमांनी प्रश्न उपस्थित केला असता अजित पवारांनी पोलिसांवर निशाणा साधला. “कुठंतरी पोलीस प्रशासन कमी पडतंय असं माझं मत आहे. पोलीस अधिकाऱ्यांना जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याबाहेर आहे. त्यांनी तसं सांगितल्यानंतर आम्ही इतर चांगल्या अधिकाऱ्यांची तिथं नेमणूक करू. महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीबद्दल मोठी चर्चा होत आहे आणि हे आपण सर्वजण पाहत आहोत”. 

 

पण मुख्यमंत्री फडणवीसांची पोलिसांबाबत बचावात्मक भूमिका

 

अजित पवारांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. पुण्याचा व्याप आणि विस्तार पाहिला तर पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतेय असं म्हणणं योग्य ठरणार नाही. अर्थात एक जरी गुन्हेगारी घटना घडली तरी ती गांभीर्यानेच घेतली पाहिजे. अशा घटना घडत आहेत आणि त्यावर आमचं लक्ष आहे. पोलीस अशा सर्व घटनांमध्ये तात्काळ आरोपींना पकडत आहेत. त्यांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पुण्याच्या सुरक्षिततेला गांभीर्याने घेत शहरातील सीसीटीव्ही नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम आमच्या सरकारने हाती घेतलं आहे. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

Share this story

Latest