विजय वरुडकर
सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचा १० वा वर्धापनदिना निमित्त वन्यजीव संरक्षक पर्यावरण परिषदेचे आयोजन....
पुणे : सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय कर्तव्य परिषद पुणे आणि राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण पर्यावरण परिषदेचे आयोजन सोयरे वनचरे सामाजिक संस्था यांच्या सहयोगाने पुण्यात करण्यात आले आहे. तसेच यादरम्यान स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना विवेकानंद जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित येणार आहे, अशी माहिती मुख्य आयोजक विजय वरुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विजय वरुडकर पुढे म्हणाले, राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण परिषदेत माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या उपस्थितीत वन्यप्राण्यांच्या संरक्षण, वन्यजीव रक्षक यांच्या समस्या व निवारण उपाय यावर विषयी चर्चा व विचारमंथन होणार आहे. वन्यजीव रक्षकांचे राज्य पातळीवर संघटन बांधणी व सक्षमीकरण हे या परिषदेचे महत्व आहे.
घोले पाटील रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात रविवारी (दि. १२ जानेवारी) दुपारी ४ ते रात्री ८ यावेळेत हा कार्यक्रम होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासह योगाचार्य रमेश अग्रवाल लिखित 'आरोग्य साक्षरता' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. तसेच वन्य जीवरक्षक सर्पमित्र एस बी रसाळ, विनय कुलकर्णी, डॉ गणेश गायकवाड, ह.भ.प.कु राजश्री कडगल, बाळ काळणे, सूकेश झंवर यांना विवेकानंद वन्यजीव रक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच यावर्षीपासून संस्थेचे दिवंगत विश्वस्त सामाजिक कार्यकर्ते स्व. नारायणकुमार फड यांच्या नावाने सामाजिक कार्यकर्ता प्रथम पुरस्कार स्वप्नील गंगणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा,धारिवाल फाऊंडेशनच्या शोभा धारिवाल, राष्ट्रपती नारीशक्ती पुरस्कार प्राप्त सर्पमित्र वनिता बोराडे, डॉ. हेडगेवार स्मारक सेवा समितीचे कोषाध्यक्ष अभय माटे, ज्येष्ठ सर्प शास्त्रज्ञ निलीमकुमार खैरे, पतंजली योग समितीचे बापू पाडळकर, ज्येष्ठ योगाचार्य दादा जोशी, ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय कर्तव्य अभियान संचालक सारिका शेठ, पौर्णिमा इनामदार, चेतन मराठे, गौरी शेणोलीकर, सागर पाटील मान्यवर उपस्थित होते.