आरटीई प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून; प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांची माहिती

राज्यातील खासगी शाळांमध्ये केल्या जाणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवरील आरटीईची प्रवेश प्रक्रिया सोमवार (दि. १६) पासून सुरू केली जाणार आहे. यासाठीचे वेळापत्रक तयार केले जात असून इतर आवश्यक तयारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सुरू झाली असल्याची माहिती शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पहिल्या टप्प्यात शाळांच्‍या नोंदणीसह ऑनलाइन प्रवेश,

राज्यातील खासगी शाळांमध्ये केल्या जाणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवरील आरटीईची प्रवेश प्रक्रिया सोमवार (दि. १६) पासून सुरू केली जाणार आहे. यासाठीचे वेळापत्रक तयार केले जात असून इतर आवश्यक तयारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सुरू झाली असल्याची माहिती शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

मागील वर्षी विविध कारणांमुळे आरटीईची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली होती. यामुळे प्रशासन आणि शाळांसह पालकांनाही याचा त्रास सोसावा लागला होता; मात्र यंदाचे प्रवेश लवकर सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आदेश दिल्याने आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात १५ डिसेंबरपासून केली जाणार आहे. यासाठी प्रवेशाचा एकूण कार्यक्रम त्याचे वेळापत्रकही पुढील काही दिवसात जाहीर केले जाणार असल्याची माहिती संचालक गोसावी यांनी दिली.

आरटीई प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी केली जाणार आहे. या नोंदणीसाठी आवश्यक असलेली माहिती या आधीच विभागाकडे तयार असून काही नवीन शाळा, वाढलेल्या वर्ग तुकड्या आणि त्यातील वाढलेल्या प्रवेशाच्या जागांची माहिती काही दिवसांच्या आत जमविण्याचे नियोजन आहे. यानंतर लगेचच मुलांच्या प्रवेशासाठीच्या नोंदणीला सुरुवात होईल आणि मुदतीत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले जात असल्याचेही संचालक गोसावी यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळा, संस्थांनी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकच्या सर्व प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. काहींनी थेट प्रवेश देऊन बाकीची सर्व प्रक्रिया करून घेतली आहे. अनेक महत्त्वाच्या शाळांमध्ये आरटीईसाठी उपलब्ध असलेल्या जागाही काही शाळा याच कालावधीत आपल्याकडे आलेल्या प्रवेशातून भरून घेतात. यामुळे याच काळात आरटीईची प्रवेश प्रक्रियाही तत्काळ सुरू करण्याची मागणी आप पालक युनियनसह इतर पालक संघटनांनी केली होती. या मागणीपूर्वीच विभागाने आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविण्याची तयारी दर्शवली आहे.

यंदा २६ हजार ८४० जागा राहिल्या रिक्त

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पुणे जिल्ह्यात दरवर्षी आरटीईचे सर्वाधिक प्रवेश होतात. यंदा ९७० शाळांमध्ये आरटीईच्या १७ हजार ५८८ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ४८ हजार १५५ अर्ज आले होते. त्यामुळे पहिली यादी आणि तीन प्रतीक्षा यादी मिळून पुणे जिल्ह्यात तब्बल १३ हजार ६६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते.

दरम्यान, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत यंदा राज्यात ७८ हजार ३९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले होते. उशिरा प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सर्व फेऱ्यांनंतरदेखील २६ हजार ८४० जागा रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest