आरएसएसचे प्रचारक मदनदास देवींवर उद्या पुण्यात अंत्यसंस्कार, अमित शाह राहणार उपस्थित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुशल संघटक आणि ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे आज सोमवारी पहाटे पाच वाजता बंगळुरू येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह होते. उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
मदनदास देवी यांचे पार्थिव मंगळवारी (२५ जुलै) सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत पार्थिव पुण्यातील मोतीबागेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर साडेअकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मदनदास देवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजपचे नेते गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक नेते मंडळी येणार आहेत.
दरम्यान, त्यांचे पार्थिव आज 'केशव कृपा' (बंगळुरू) येथील संघटनेच्या प्रांत कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी (२५ जुलै) सकाळी अकरा वाजता पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.