पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट, पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट
उत्तर भारतातील तयार झालेला कमी दाबाचे पट्टा दक्षिणेकडे झुकला आहे. उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओदिशा किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढल्याने पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील घाट भागात २२, २३ आणि २४ जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या २४ तासात लोणावळ्यात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर जुन्नरमध्ये ६४.५ मिमी पाऊस झाला आहे. तसेच मुळशीमध्ये ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने पुणे, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना रेड ॲलर्ट दिला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. मुंबई, रत्नागिरी, साताऱ्याला ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबारसह विदर्भाला यलो ॲलर्ट देण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.