भारत गौरव पर्यटक ट्रेन
आयआरसीटीसीकडून “रामेश्वरम-तिरुपती : दक्षिण यात्रे”साठी भारत गौरव पर्यटक ट्रेन २३ मे (मंगळवारी) रोजी धावणार आहे. ही ट्रेन मुंबई, पुण्यावरून तिरुअनंतपुरमसाठी धावणार आहे. भारत गौरव पर्यटक ट्रेन मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघून गोलाकार मार्गाने प्रवास करेल आणि २ जून २०२३ रोजी परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल.
भारत पर्यटक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, कलबुर्गी (बोर्डिंग स्टेशन); म्हैसूर, बंगलोर, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, रामेश्वरम, मदुराईवरून तिरुपतीली पोहोचेल. त्यानंतर परत कलबुर्गी, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (डी-बोर्डिंग स्टेशन) ला ही ट्रेन पोहचेल.
या ट्रेनमध्ये संरचना एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, एक पँट्री कार आणि २ जनरेटर कोच अशा सुविधा असतील. भारत गौरव टुरिस्ट ट्रेन देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या “एक भारत श्रेष्ठ भारत” आणि “देखो अपना देश” या उपक्रमांच्या अनुषंगाने आहे. ही आयआरसीटीसी टुरिस्ट ट्रेन एक सर्वसमावेशक टूर पॅकेज असेल आणि आयआरसीटीसी पाहुण्यांना सुरक्षित आणि संस्मरणीय अनुभव देण्यासाठी प्रयत्न करेल, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले आहे.