संग्रहित छायाचित्र
"रक्षाबंधन" सणानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी बुधवार आणि गुरूवारी पुणे परिवहन महामंडळामार्फत मार्गावर धावणाऱ्या दैनंदिन बस संख्येपेक्षा जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याबसेच्या माध्यमातून अवघ्या दोन दिवसात पीएमपीएमएलला ४ कोटी ११ लाख ७२ हजार २३७ रुपयांचा महसूल पाप्त झाला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पी.एम.आर.डी.ए. हद्दीत बससेवा पुरविण्यात येते. रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दरवर्षी प्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलकडून ३० आणि ३१ ऑगस्ट २०२३ रोजी नियोजित १८३७ दैनंदिन बस संख्येव्यतिरिक्त ९६ जादा बसेसचे नियोजन करून देण्यात आले होते. या बसेस गर्दीच्या मार्गांवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पीएमपीएमएलच्या बससेवेला ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
रक्षाबंधन सणानिमित्त ३० ऑगस्ट रोजी सोडण्यात आलेल्या ९६ जादा बसेसमधून १३ लाख ७३ हजार ८१९ नागरिकांनी प्रवास केला. ज्यामधून १ कोटी ९५ लाख २७ हजार ३८४ रुपये पीएमपीएमएलला महसूल प्राप्त झाला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी १४ लाख ९६ हजार २८२ नागरिकांनी प्रवास केला. ज्यामधून २ कोटी १६ लाख ४४ हजार ८५३ रुपये महसूल प्राप्त झाला. अशा प्रकार दोन दिवसांत एकून २८ लाख ७० हजार १०१ नागरिकांनी पीएमपीएमएलमधून प्रवास केला. ज्यामधून ४ कोटी ११ लाख ७२ हजार २३७ रुपयांचा महसूल पाप्त झाला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.