पाऊस गायब, उद्यापासून वरंधा घाट वाहतूकीसाठी खुला
घाटमाथ्यावरील पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे, पुणे जिल्ह्यातील भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट उद्यापासून (२५ ऑगस्ट) सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीला खुला करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत.
मुसळधार पावसामुळे घाटातील दरड कोसळून दुर्घटना घटण्याची शक्यता होती. त्यामुळे, सुरक्षिततेच्या दृष्टीने भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आला होता. वाहनांची वाहतूक बंद करुन इतर वेळी हलक्या वाहनांची वाहतुक सुरु ठेवण्यात आली होती.
आता हवामान खात्याकडून अतिवृष्टीबाबत कोणत्याही प्रकारचे इशारे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वरंधा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.