पुणेकरांनो, मुंबईला जाताय? एक्सप्रेस वे आज दोन राहणार बंद
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ रात्री १० वाजून २५ मिनिटांच्या सुमारास दरड कोसळली होती. यामुळे मुंबईला येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मलबा हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, महामार्गावर आता देखील धोकादायक दरड कोसळू शकते. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज दुपारी दोन तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर रात्री दरड कोसळली होती. यामुळे मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद करण्यात आल्या होत्या. येथील वाहतूक सुरळीत होत नाही तोच लोणावळा लगत आणखी एक दरड कोसळली. सकाळी सहाच्या सुमारास ही दरड कोसळली आहे.
मात्र, आडोशी बोगद्याच्या तुलनेत ही दरड खूपच कमी होती. महामार्गावर आता देखील धोकादायक दरड कोसळू शकते. त्यामुळे, दरडमधील मलबा व डोंगरावरील अडकलेले दगड पाडण्यासाठी आज दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत दोन तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान, एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक (लेन) पूर्णपणे बंद करण्यात राहणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.