पुणेकरांनो, बस चालक नियम मोडतात? इथे करा तक्रार अन् मिळवा बक्षिस
पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रायव्हेट लिमिटेडने नियम तोडणाऱ्या बस चालक आणि वाहकांना शिस्त लावण्यासाठी नविन उपक्रम सुरू केला आहे. कोणताही बस चालक किंवा वाहक ड्युटीवर असताना नियमांचे उल्लंघन करत असेल तर पुराव्यासह ई-मेला आयडी किंवा व्हाट्सअपवर तक्रार करा. योग्य तक्रार करणाऱ्यास पीएमपीएमएल प्रशासनाकडून १०० रुपये बक्षिस दिले जाणार आहे.
कोणताही चालक किंवा वाहक ड्युटीवर मोबाईल फोन वापरताना, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवताना किंवा रुट बोर्ड नसलेली बस चालवताना आढळल्यास पीएमपीएमएल कडे ईमेल: complaints@pmpml.org किंवा व्हाट्सअप : 9881495589 द्वारे त्वरित तक्रार करा.
ड्युटीवर असताना चालक किंवा वाहक सर्व नियमांचे पालन करतील याची खात्री करण्यासाठी, आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला आहे त्याकरिता आम्ही सर्व नागरिकांना आम्हाला पाठिंबा देण्याची विनंती करतो.
— Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (@PMPMLPune) July 12, 2023
कोणताही चालक किंवा वाहक ड्युटीवर मोबाईल फोन वापरताना, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवताना किंवा रुट… pic.twitter.com/N8ZxvaA7Dl
तक्रारीमध्ये फोटो / व्हिडिओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख आणि वेळ या सर्व तपशीलांसह तक्रार नोंदवा. तक्रार योग्य असल्यास नागरिकांना १०० रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येईल तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर १००० रुपयांचा दंड लादण्यात येईल, अशी माहिती पीएमपीएमल प्रशासनाने दिली आहे. या नविन उपक्रमात सहभागी व्हावे आणि पुणेकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.