पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ, सुरेश गोसावी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी मंगळवारी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड करण्यात आली. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी, कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय भावे यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. रवींद्र कुलकर्णी व डॉ. गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 7 Jun 2023
  • 12:20 am
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ, सुरेश गोसावी

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ, सुरेश गोसावी

राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून घोषणा; २७ उमेदवारांमधून िनवड

#पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी मंगळवारी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड करण्यात आली. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी, कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय भावे यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. रवींद्र कुलकर्णी व डॉ. गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी २७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात विद्यापीठातील विविध विभागांमध्ये व विद्यापीठाच्या महत्त्वाच्या पदांवर काम करत असलेल्या ११ उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला होता. या उमेदवारांमध्ये कुलगुरुपदासाठी चुरस होती. त्यातील चार उमेदवारांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली, तर एक उमेदवार विद्यापीठाबाहेरील होता.

मुलखतीनंतर विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय ढोले, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुरेश गोसावी आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी या पाच उमेदवारांबाबत चर्चा होती.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची निवड प्रक्रिया तब्बल वर्षभर लांबली होती. विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी १८ व १९ मे रोजी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातील पाच उमेदवारांची नावे अंतिम मुलाखतीसाठी निश्चित केली होती. त्यातील डॉ. गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना प्रशासनाचाही अनुभव आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest