पुणे: स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी घेतली कर्मचाऱ्यांची शाळा

स्वच्छ भारत स्पर्धेचे सर्वेक्षण सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारी सुरू केली आहे. आपली कामगिरी सुधारावी यासाठी घनकचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणात गुण कसे मिळतात याचे धडे देण्यात आले असून त्यांची कार्यशाळा गुरुवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी घेतली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Edited By Admin
  • Fri, 5 Jul 2024
  • 12:34 pm
Pune news, Swachh Bharat competition, municipal corporation, PMC, new survey

संग्रहित छायाचित्र

अधिक गुण मिळविण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या मोलाच्या टिप्स

स्वच्छ भारत स्पर्धेचे सर्वेक्षण सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारी सुरू केली आहे. आपली कामगिरी सुधारावी यासाठी घनकचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणात गुण कसे मिळतात याचे धडे देण्यात आले असून त्यांची कार्यशाळा गुरुवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी घेतली.

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेत महापालिकेला चांगले गुण मिळावेत तसेच पहिला क्रमांक मिळावा यासाठी तयारी सुरू आहे. या सर्वेक्षणात पालिकेची कामगिरी अधिक सुधारावी, त्यासाठी उपाययोजना कशा कराव्यात, क्रॉनिक स्पॉट कसे नष्ट करायचे, तसेच संपूर्ण शहर स्वच्छ कसे राहील, अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याविषयीच्या सूचना पृथ्वीराज बी. पी  यांनी गुरुवारी आढावा बैठकीत कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीला घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, सर्व परिमंडळ उपायुक्त, सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे साहाय्यक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, आरोग्य निरीक्षक आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांनी घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेविषयक कामकाजाचे सादरीकरण केले. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात किती दंड वसुली केली, याचाही अहवाल सादर केला आहे. आवश्यक साधनसामग्रीची मागणीही करण्यात आली. त्याचा आढावा घेत पृथ्वीराज यांनी सूचना दिल्या. यावेळी कर्मचारी कमी आहे, तसेच घंटागाड्यांची कमतरता भासत आहे. अशाही तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांनी केल्या. त्यावरही मार्ग काढला जाणार आहे.  सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन सूचना दिल्या आहेत. कचरा टाकला जाणारी ठिकाणे स्वच्छ करावीत, अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. यानंतर सातत्याने आढावा बैठका घेऊन त्याची नोंद ठेवली जाणार असल्याचे पृथ्वीराज बी.पी यांनी सांगितले.

८१ घंटागाड्यांची नव्याने खरेदी

पालिकेच्या प्रभागात कचरा संकलित करण्यासाठी सध्या घंटागाड्या आहेत. त्या गाड्यांवर ताण येत असल्याचे समोर आले आहे. तसेच पालिकेत समाविष्ठ गावांमध्ये कचरा संकलित करण्यासाठी घंटा गाड्यांची गरज होती. त्यामुळे महापालिकेने ८१ छोट्या घंटागाड्या खरेदी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ८.४१ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्याला मान्यता देण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest