महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी ३५ झाडांची कत्तल
पुण्यातील शास्त्रीनगर येथील मातृछाया सोसायटीच्या समोरील ५० वर्षे जुनी झाडे तोडण्याची आली आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाने रात्रीच्या वेळेस कुऱ्हाडीने घणाघाती घाव घातला या झाडांची कत्तल केली आहे. यामध्ये आंबा, चिंच, नारळ, फणस, निलगिरी, जांभूळ, बॉटल, पाम, विविध जातीची एकूण ३५ झाडे होती.
सन १९६९ साली मातृछाया सोसायटीची स्थापना झाली असून त्यात ४२ घरे आहेत. पुणे शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली विकास सुरू आहे. विकास आणि पर्यावरण हे परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहे. जवळपास ५० वर्ष जी झाडे तोडली. त्या बदल्यात महापालिकेच्या संबंधित विभागाकडून किती व कुठे झाडे लावणार आहे? याची माहिती सोसायटीच्या रहिवाशांना देण्यात आली नाही.
रस्ता रुंदीकराणासाठी अडथळा येणारे झाडे तोडली जात आहे. ते किती वर्षे जुनी आहेत. त्या झाडावर जीवजंतू, पक्ष्यांचे घरटी आहेत का नाही? हा विचार केला जात नाही. ज्या मालकाची जागा आहे त्याला त्या जागेचा मोबदला मिळाला का नाही? याची खात्री करून न घेता उद्यान आणि इतर सबंधित विभागाकडून कारवाई केली गेली, असे सोसायटी रहिवासी जयंत मोहितेसह अन्य रहिवाशांकडून सांगण्यात आले आहे.