अग्निशमक दलातील दोघांना राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर
पुणे महापालिकेच्या अग्निशमक दलातील फायर इंजिन ड्रायव्हर आणि अॅम्ब्युलन्स अटेंडंट या दोन कर्मचाऱ्यांना ‘गुणोत्कृष्ट आग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी (15 ऑगस्ट) त्यांना पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
करीमखान फैजलखान पठाण आणि नरसिह बसप्पा पटेल अशी फायर इंजिन ड्रायव्हर आणि अॅम्ब्युलन्स अटेंडंट यांची नावे आहेत. करीमखान पठाण हे १९८८ मध्ये अॅम्ब्यूलन्स अटेन्डट म्हणून पुणे महापालिकेच्या अग्निशमक दलाच्या सेवेत दाखल झाले. त्यानंतर त्यांची १९७७ मध्ये फायर इंजिन चालक या पदावर बढती झाली.
नरसिंह पटेल हे १९८८ मध्ये अॅम्ब्यूलन्स अटेनडंट म्हणून पुणे मनपाच्या अग्निशमन दलात रुजू झाले. त्यांनी रुग्णवाहिकेवर काम करत असताना अनेक रुग्णांना वेळेवर रुग्णालयात दाखल केले आहे. पटेल यांना आपल्या २५ वर्षाच्या काळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक पारितोषीकांनी गौरविण्यात आले आहे. तसेच ३६ वर्षाच्या प्रदिर्घ काळात करीमखान पठाण यांनी देखील मोलाची कामगिरी बजावली आहे. ‘गुणोत्कृष्ट अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाल्याबद्दल करीमखान पठाण व नरसिंह पटेल यांना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.