‘पुणे पोलिसांनी साधा संपर्कही साधला नाही’ - कल्याणीनगर दुर्घटनेतील मृत अनिश, अश्विनीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली खंत

संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या पुण्यातील पाेर्शे कार अपघातात मध्य प्रदेशातील जबलपूर येथील दोन आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाला. पुण्यातीलच नव्हे तर देशातील नागरिक या घटनेच्या निषेधार्थ पुढे आले आहेत. बेभान कार चालविणाऱ्या बिल्डरपुत्रावर नागरिकांच्या दबावामुळे कारवाईही झाली.

मृत अश्विनी कोस्टा आणि मृत अनिश अवधिया

संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या पुण्यातील पाेर्शे कार अपघातात मध्य प्रदेशातील जबलपूर येथील दोन आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाला. पुण्यातीलच नव्हे तर देशातील नागरिक या घटनेच्या निषेधार्थ पुढे आले आहेत. बेभान कार चालविणाऱ्या बिल्डरपुत्रावर नागरिकांच्या दबावामुळे कारवाईही झाली. मात्र, पुणे पोलिसांनी अद्यापर्यंत या दोन्ही आयटी इंजिनिअरच्या कुटुंबाशी संपर्कही साधला नसल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

मृत अनिश अवधियाचे मामा ज्ञानेंद्र सोनी ‘ सीविक मिरर’शी बोलताना म्हणाले की, आमच्याशी पुणे पोलिसांनी संपर्क तर केला नाहीच. पण  मध्य प्रदेश सरकारचाही कोणी प्रतिनिधी आमच्या भेटीस आला नाही.

रविवारी पहाटे १७ वर्षांचा मुलगा आपल्या तीन मित्रांसह दोन पबमध्ये वेळ घालवून घरी परतत असताना त्याने कल्याणीनगर रस्त्यावर भरधाव पोर्श कार चालवली होती. यामध्ये मोटारसायकलवरून जाणारा अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला होता. अनिशने डीवाय पाटील कॉलेजमधून पदवी पूर्ण केली होती. अश्विनीने वाडिया कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली होती. दोघे एका आयटी कंपनीत काम करत होते. 

 अनिशची आई सविता म्हणाली, "आताच कोठे  आमचे चांगले दिवस सुरू झाले होते. अनिशचे नाव लकी होते. कारण, तो आम्हा सर्वांसाठी लकी चार्म होता. आमची पिढी व्यवसायात असली तरी तो आमच्या कुटुंबातील पहिला अभियंता होता. माझे पती ओमप्रकाश  प्रींटिंग प्रेसचा व्यवसाय चालवतात. त्यासाठी आम्ही आमचे दागिने विकले होते. अनिशमुळे आम्ही खूप स्वप्ने पाहिली होती. अनिशला अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे होते. धाकट्या भावाला अभियांत्रिकी शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून त्याने त्याग केला आणि नोकरी सुरू केली होती. 

 अनिशचे वडील  ओमप्रकाश म्हणाले, "मुलापेक्षाही तो माझा चांगला मित्र होता. आम्ही त्याला लकी म्हणायचो. त्याचे परदेशात जाण्याचे स्वप्न होते. 

अश्विनीचा मोठा भाऊ संप्रित म्हणाला, "आमच्या दु:खावर कोणताही उपाय होऊ शकत नाही. आमच्या आणि अवधिया कुटुंबीयांच्या वेदना कोणाला समजणार नाहीत. एका सेकंदात आमचे स गळे आयुष्यच बदलून  गेले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest