PMPML Bus : पुणेकरांनो, घरबसल्या पीएमपी बसचे लोकेशन पहा अध्यक्ष आल्यावरच; 'गो अॅप'ला सध्या तरी मुहूर्त नाही

पीएमपी बसने प्रवास करायचा असेल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वीच बसचे लोकेशन, बसस्टॉपवर येण्यास लागणारा वेळ आणि घरबसल्याच तिकीट काढण्याची सुविधा पीएमपी 'गो अॅप' च्या माध्यमातून मिळणार आहे. हे अॅप पीएमपीकडून ऑक्टोबर अखरे सुरु केले जाणार होते.

PMPML Bus : पुणेकरांनो, घरबसल्या पीएमपी बस पहा अध्यक्ष आल्यावरच; 'गो अॅप'ला सध्या तरी मुहूर्त नाही

PMPML Bus : पुणेकरांनो, घरबसल्या पीएमपी बसचे लोकेशन पहा अध्यक्ष आल्यावरच; 'गो अॅप'ला सध्या तरी मुहूर्त नाही

तांत्रिक अडचणींचा अडथळा, तारखांचा खेळ रंगणार

पुणे : पीएमपी बसने प्रवास करायचा असेल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वीच बसचे लोकेशन, बसस्टॉपवर येण्यास लागणारा वेळ आणि घरबसल्याच तिकीट काढण्याची सुविधा पीएमपी 'गो अॅप' च्या माध्यमातून मिळणार आहे. हे अॅप पीएमपीकडून ऑक्टोबर अखरे सुरु केले जाणार होते. त्यानंतर पुन्हा १ नोव्हेंबरला अॅप सुरु होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र आता हे अॅप तांत्रिक अडणीत अडकले असून एक महिनाभरात सुरु होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच अॅप सुरु करण्यासाठी निवडणूकीच्या कामासाठी गेलेल्या पीएमपीच्या नवीन अध्यक्षांची वाट पाहावी लागणार आहे.

पीएमपीचे तत्कालीन सचिन्द्र प्रताप सिंह यांनी गो अॅप सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या आदेशाने यंत्रणा कामाला लागली होती. मात्र अध्यक्षांची बदली होताच यंत्रणा झोपी गेली आहे. हे अॅप तांत्रिक अडचणीत अडकले असल्याचे सांगितले जात आहे. अॅपचे सादरीकरण करताना थोडक्यात माहिती सादर केली होती. प्रवाशांना हव्या असलेल्या सुविधा त्यात दिलेल्या नव्हत्या. त्यामुळे पुन्हा याचा विचार केला जात आहे. अॅपमध्ये प्रवाशांच्या सुविधांचा त्यात समावेश केला जाणार आहे. यासाठी आणखी एक महिना लागणार असल्याचे आता प्रशासानाकडूने स्पष्ट केले आहे. पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यास असमर्थता दाखविली.

पीएमपीचे नवीन अध्यक्ष निवडणूकीच्या कामासाठी...

पीएमपीच्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती होऊन आठवडा झाला नसताना त्यांना सरकारने लोकसभेच्या निवडणूकीच्या कामासाठी दुसऱ्या राज्यात पाठवले आहे. ते नेमके कोणत्या राज्यात गेले आहेत, याची माहिती पीएमपीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे नाही. ते कधी येणार आहेत, याची देखील माहिती नाही. त्यामुळे अध्यक्ष कधी येणार, ते पीएमपीचे कामकाज कधी समजून घेणार हा प्रश्न आहे. अध्यक्ष आल्यानंतर त्यांना गो अॅपची माहिती सादर केली जाणार आहे. त्यानंतर ते सुरु करण्याचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी गो अॅपला मुहूर्त नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच अॅपला तांत्रिक अडचणींचा अडथळा आहे. त्यामुळे अॅप सुरु होण्यासाठी तारखांचा खेळ पीएमपीकडून खेळला जाण्याची शक्यता आहे.

'गो अॅप' मध्ये काय आहे...?

- पीएमपीच्या सर्व मार्गांची माहिती

- बसचे शेड्युल पाहून घरबसल्या किंवा कामाच्या ठिकाणावर बसून तिकीट काढता येणार

- वाहकाला स्कॅनर 'दाखवताच तिकीट आपल्या हातात

- अॅपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest