संग्रहित छायाचित्र
मोहरमनिमित्त शनिवारी (२९ जुलै) पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या ताबूतांच्या मिरवणुकीमुळे शनिवारी दुपारनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
ख्य मिरवणूक (दुपारी तीन वाजता)
मार्ग : श्रीनाथ टॉकीज येथून दत्त मंदिर बेलबाग चौक- बुधवार चौक - जिजामाता चौक- डावीकडे वळून शनिवारवाडा फुटक्या बुरुजास वळसा घालून शनिवारवाड्यासमोरील गाडगीळ पुतळा चौक- उजवीकडे वळून डेंगळे पूल - रेल्वे पुलाखालून आरटीओ चौक ते संगम पूल याठिकाणी विसर्जन.
लष्कर मिरवणूक (दुपारी १२ वाजता)
मार्ग :- ताबूत स्ट्रीटपासून बाटलीवाला बगीचा- सरबतवाला चौक- बाबाजान दर्गा- गावकसाब मशीद- डावीकडे वळून एम. जी. रस्त्याने कोहिनूर चौक- नाझ हॉटेल चौक- डावीकडे वळून बुटी स्ट्रीटने बाटलीवाला बगीचा चौकात दुपारी दोनच्या सुमारास धार्मिक कार्यक्रमासाठी थांबतात. त्यानंतर मिरवणूक पुढे नेहरू मेमोरिअल हॉल- जुना समर्थ पोलिस ठाणेमार्गे डावीकडे वळून के. ई. एम. रुग्णालयासमोरुन दारुवाला पूल- फडके हौद चौक- बेलबाग चौक मार्गाने श्रीनाथ सिनेमा येथे मुख्य मिरवणुकीत सहभागी होते.
खडकी भागातून निघणारी मिरवणूक (सायंकाळी ६.४५ वाजता)
मार्ग :- ताबूत मिरवणूक बोपोडी चौकातून मुंबई-पुणे रस्त्याने दापोडीतील नदी किनारी विसर्जन होणार आहे.
पाटील इस्टेट गल्ली क्रमांक दहा- मिरवणूक (दुपारी दोन वाजता)
मार्ग :- रेशीम विभाग व दूध डेअरीजवळील ताबूत मिरवणुकीने पाटील इस्टेट या ठिकाणी येऊन पुन्हा परत जागेवर येणार आहेत. पाटील इस्टेट येथील ताबूत मिरवणूक संगम पूल या ठिकाणी विसर्जित होणार आहे.
इमामवाडा येथून निघणारी मिरवणूक (सकाळी १०.३० वाजता)
मार्ग :- इमामवाडा लष्कर- आगाखान कंपाउंड ते परत इमामवाडा मार्ग, नेहरू मेमोरिअल चौक, डावीकडे वळून पोलिस आयुक्त कार्यालयासमोरुन जनरल पोस्ट ऑफिस चौक, साधू वासवानी चौक, १३ कॅनॉट रोड, आगाखान कंपाउंड येथे धार्मिक कार्यक्रम होऊन परत उलट मार्गाने इमामवाडा येथे विसर्जन.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.