रास्ता पेठेत वडाचे जुने झाड कोसळले, पाच जण जखमी
पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडपडीची घटना समोर आली आहे. पुण्यातील रास्ता पेठ पॉवर हाऊस समोर जुने वडाचे झाड पडले आहे. ही घटना गुरूवारी रात्री घडली आहे. यामध्ये ४ ते ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
रास्ता पेठ पॉवर हाऊस समोर जुने भले मोठे वडाचे झाड होते. पावसामुळे झाड पडल्यामुळे येथील रस्ता बंद झाला होता. घटनेची माहिती मिळातच महापालिकेची फायर ब्रिगेड, उद्यान विभागाची टीम आणि महावितरणची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती.
जवानांनी बंद झालेला रस्ता टप्प्याटप्प्याने सकाळपर्यंत सुरू केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींवर केईएम रुग्णालयात प्रथमोपचार करून सोडण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.