Pune News: आनंदनगर येथील झोपड्यांवर महापालिकेने चालवला बुलडोझर

पुणे: बिबवेवाडी (Bibwewadi) येथील गंगाधाम चौकातील आनंदनगर (Anandnagar) येथील गंगाधाम चौकातील ९ झोपड्यांवर पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने मंगळवारी बुलडोझर चालवला.

PMC News

आनंदनगर येथील झोपड्यांवर महापालिकेने चालवला बुलडोझर

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने केली कारवाई ; ९ झोपड्या हटविल्या, बिल्डरच्या भल्यासाठी कारवाई केल्याचा नागरिकांचा आरोप

पुणे: बिबवेवाडी (Bibwewadi) येथील गंगाधाम चौकातील आनंदनगर (Anandnagar) येथील गंगाधाम चौकातील ९ झोपड्यांवर पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने मंगळवारी बुलडोझर चालवला. नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त करुन रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बिल्डरच्या भल्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप केला आहे. 

गंगाधाम चौकातील झोपडपट्टी वासियांवर गेल्या दोन वर्षापूर्वी कारवाई करून ८० झोपड्या हटविण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे पुनर्वसन देखील करण्यात आले आहे. तसेच काहींना मोबदला देण्यात आला होता. त्यापैकी आता ९ झोपडीधारक या भागात राहत होते. त्यांच्यावर नियमानुसारच कारवाई करण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी या झोपड्या हटविण्यात येण्याची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे मंगळवारी (दि.३०) सकाळी कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिकेने आणि पोलीस कर्मचारी असे मिळून एकूण सुमारे ५० कर्मचारी उपस्थित होते. या जागेवरील झोपड्या काढण्यात आल्या असून ही जागा मोकळी करुन त्यावर महापालिकेने ताबा घेतला आहे. या मोकळ्या केलेल्या जागेवर पथ विभागाने रस्त्याचे काम करावे, असे पत्र दिले आहे. अशी माहिती बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड यांनी दिली. या भागात गेल्या ४० वर्षांपासून नागरिक राहत आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अतिक्रमण विरोधी कारवाई महापालिकेने दाखविली आहे. परंतु ही कारवाई केवळ बिल्डर आणि राजकीय व्यक्तीच्या हितामुळे करण्यात आली आहे. यामध्ये बडे राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे. असा आरोप नागरिकांनी केला आहे.  (PMC News)

सर्व्हे नंबरच्या घोळामुळे घात...

आनंदनगर सर्व्हे नंबर ५८० यांची नोंद असलेल्या झोपडी धारकांना महापालिकेकजून पुनर्वसन करण्यात आले. यातील काहींना रोख मोबदला तर काहींना घरे देण्यात आली आहेत. परंतु आमच्या झोपडीची नोंद करताना त्यावर ५७८ सर्व्हे नंबर देण्यात आला. नेमका यामुळे आमचा घात झाला. त्यामुळे पुनर्वसन करताना आमचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. या चौकाच्या आजूबाजूला मोठ्या आलिशान इमारती उभारल्या आहेत. इतर बांधकामे सुरु आहेत. आम्ही राहत असलेली जागा ही एका खासगी बिल्डरची आहे. त्याने देखील ही जागा बळाकवलेली आहेत. जागा नावार घेण्यासाठी त्याने कायदेशीर लढा दिला. त्यानंतर त्याला जागा मिळाली. त्यामुळेच आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच राजकीय व्यक्तींनी एकत्र बिल्डरच्या भल्यासाठी आम्हाला बेघर करुन रस्त्यावर आणले आहे. आम्ही याठिकाणी गेल्या चाळीस वर्षांपासून राहत आहोत. आम्हाला देखील न्याय मिळायला हवा, अशी भावना येथील नागरिकांनी सीविक मिररशी बोलताना व्यक्त केली.

झोपेत असतानाच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या घरावर बुलडोझर चालवाला. कोणत्याही प्रकारची नोटीस आम्हाला देण्यात आली नव्हती. बिल्डरांसाठी आमच्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अन्याय केला आहे. आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच पुनर्वसन करण्यात यावे.

  - बाबा खंडागळे, झोपडीधारक. 

दोन वर्षापूर्वी अनधिकृत इमारतीमध्ये केले आहे पुनर्वसन...

 गंगाधाम चौकातील आनंदनगर झोपडपट्टीतील काही कुटुंबियांचे हिलटॉप हिलस्लोपवर अनधिकृत इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये मागील वाद झाले होते. या इमारतीमध्ये एकच लाईट मीटर असून एकल लाख ७० हजार बीज बील थकले आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या आठदिवसांपासून येथील नागरिक अंधारात रात्र काढत आहेत. त्यामुळे येथे पुनर्वसन केलेल्या नागरिकांचे देखील हाल केले जात आहेत. गरीबाने जगू नये का असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

रस्ता रुंदीकरणाचे नावाखाली झोपड्या पाडण्यात आल्या आहेत. परंतु ही कारवाई करण्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन करावे, अशी आमची मागणी होती. कारावाईला विरोध देखील करण्यात आला. यापूर्वी दोन ते तीन वेळा अंदोलने, मोर्च काढण्यात आले होते.  परंतु महापालिकेचे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्हे तर बिल्डरांसाठी करत आहेत. कारवाई करुन या नागरिकांवर अन्याय केला आहे. महापालिकेने या सर्व नागरिकांचे याभागात जवळच्या ठिकाणी पुनर्वसन करावे, अन्यथा योग्य मोबदला द्यावा.

 - संतोष नांगरे, अध्यक्ष, पर्वती विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष.

महापालिकेने कारवाई करण्यापूर्वी येथील नागरिकांचे योग्य पुनर्वसन करावे, त्यानंतरच कारावाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. योग्य पुनर्वसन न झाल्यास आंदोलन केले जाईल. 

- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते

आनंदनगर येथे रस्ता रुंदीकरणामध्ये येणार्या काही झोपडपट्टीवासियांचे बिबवेवाडी येथे पुर्नवसन करण्यात आले आहे. तर काहींना रोखीने मोबदला देण्यात आला आहे. लवकरच येथील रस्ता रुंद करण्यात येणार आहे.

- अविनाश सकपाळ, झोन तीन, उपायुक्त, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest