पुणे मेट्रोला महावितरणकडून वीजपुरवठा नाही; अंतर्गत यंत्रणेतील बिघाडामुळे मेट्रोची सेवा ठप्प

महावितरण कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. तसेच पुणे मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी कोणताही संबंध नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 16 Aug 2023
  • 02:04 pm
Pune metro : पुणे मेट्रोला महावितरणकडून वीजपुरवठा नाही; अंतर्गत यंत्रणेतील बिघाडामुळे मेट्रोची सेवा ठप्प

पुणे मेट्रोला महावितरणकडून वीजपुरवठा नाही; अंतर्गत यंत्रणेतील बिघाडामुळे मेट्रोची सेवा ठप्प

वीजपुरवठ्यासंदर्भात महावितरणने दिले स्पष्टीकरण

नव्यानेच सुरू झालेल्या पुणे मेट्रोचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सोमवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वनाझ ते रूबी हॉल मार्गावरील सेवा २० मिनिटे बंद पडली होती. यासाठी महावितरण कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. तसेच पुणे मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी कोणताही संबंध नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की, पुणे महामेट्रोला महावितरणकडून (MSEDCL) नव्हे, तर महापारेषण (MSETCL) कडून १३२ केव्ही दाबाचा वीजपुरवठा केला जातो. महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पुणे मेट्रोकडून रेंजहिल्स अतिउच्चदाब १३२ केव्ही उपकेंद्रात वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू होते.

त्यावेळी मेट्रोच्या अंतर्गत वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो सेवेचा वीजपुरवठा २० मिनिटे बंद होता. मात्र या प्रकाराशी महावितरण व महापारेषण कंपनीचा कोणताही संबंध नाही. तर मेट्रोच्या अंतर्गत वीज यंत्रणेतील बिघाडामुळे मेट्रो सेवा २० मिनिटे ठप्प झाली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest