संग्रहित छायाचित्र
पुणे: पुणे-लोणावळा सेक्शनवर अभियांत्रिकी आणि दुरुस्तीची तांत्रिक कामे होणार असल्याने रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी पुणे - लोणावळा - पुणे दरम्यान लोकल गाड्या रद्द राहतील, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागा द्वारे प्रसिद्धी पत्रिकेद्वारे जाहीर करण्यात आले आहे. (Pune News)
तपशील खालील प्रमाणे आहे
पुणे ते लोणावळा (अप सबअर्ब) गाड्या रद्द
१. पुण्याहून लोणावळा साठी ०९.५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२ रद्द राहील.
२. पुण्याहून लोणावळा साठी ११.१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४ रद्द राहील.
३ . पुण्याहून लोणावळा साठी १५.०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ रद्द राहील.
४. शिवाजीनगरहून तळेगाव करीता १५.४७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८ रद्द राहील.
५. पुण्याहून लोणावळा साठी १६.२५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८ रद्द राहील.
६. शिवाजीनगर वरून लोणावळा करीता १७.२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० रद्द राहील.
लोणावळा ते पुणे (डाऊन सबअर्ब) रद्द गाड्या
१. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १०.०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९ रद्द राहील.
२. लोणावळ्याहून पुणे साठी १४.५० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१ रद्द राहील.
३. तळेगाव येथून पुणे साठी १६.४० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९ रद्द राहील.
४. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १७.३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५ रद्द राहील.
५. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी १८.०८ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६७ रद्द राहील.
६. लोणावळ्याहून पुण्यासाठी १९.०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९ रद्द राहील.
मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन:
गाडी क्रमांक १२१६४ एमजीआर चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये ०३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल. अशा प्रकारचा मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याने प्रवाशांनी गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.