PUNE: गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे (Gaja Marane) याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांचे भेट घेतली. गजा मारणे याच्यासोबत त्यांची पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री मारणे

गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला

सपत्नीक घेतली भेट : राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे (Gaja Marane) याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांचे भेट घेतली. गजा मारणे याच्यासोबत त्यांची पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री मारणे (Jayashree Marne) यादेखील उपस्थित होत्या. त्यामुळे जयश्री मारणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत. (Latest News Pune)

पार्थ पवार यांची गजा मारणे याने भेट घेतल्यानंतर शहराच्या गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासोबतच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील आश्चर्य व्यक्त करीत आहेत.  मारणेवर खून, खंडणी अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेकदा मोक्का कारवाई देखील करण्यात आलेली आहे. शहरातील प्रमुख नामचीन गुंडांमध्ये ज्याच्या मारणे याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. 

त्याने पार्थ पवारांची भेट घेतल्यानंतर पुढची राजकीय गणित काय असणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रदीप देशमुख आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest