संग्रहित छायाचित्र
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बाप आणि मुलगी बुडाल्याची घटना समोर आली आहे. यात मुलीचा मृत्यू झाला असून वडील अद्याप बेपत्ता आहेत. १५ ऑगस्टनिमित्त ते पर्यटनासाठी बॅक वॉटर असलेल्या जयतपाड येथे गेले होते.
ऐश्वर्या धर्माधिकारी (वय १३) असे मृत मुलीचे नाव आहे. तर शिरीष धर्माधिकारी (वय ४५) यांचा शोध सुरु आहे. हे बाप-लेक पुण्यातील औंध येथील रहिवासी होते. पुण्यातील औंध परिसरातून १५ ऑगस्ट रोजी ते कुटुंबीयांसोबत जयतपाड येथे पर्यटनासाठी आले होते.
काल दुपारी चारच्या सुमारास सर्व जण सीमा फार्म हाऊच्या मागे असणाऱ्या भाटघर धरणाचे बॅक वॉटर पाहायल गेले. त्यावेळी शिरीष धर्माधिकारी हे बेबी पूल पाहण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी मुलगी ऐश्वर्यालाही बोलावून घेतले. शिरीष धर्माधिकारी आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या हे भाटघर धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र खोल पाण्यात पोहत असताना दोघेही बुडाले.
यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु केले. त्यांनी ऐश्वर्याला बाहेर काढले. तिला भोरमधील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर शिरीष धर्माधिकारी यांचा शोध अद्याप लागलेला नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.