वीजग्राहकांकडे २०४ कोटींची थकबाकी, महावितरणने १४ हजार ग्राहकांची बत्ती केली गुल
पुणे परिमंडळातील सर्व प्रकाराच्या ७ लाख ८ हजार ८९२ वीजग्राहकांकडे २०४ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या पंधरवड्यात पुणे परिमंडलातील १४ हजार १५५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (ता. २९) व रविवारी (ता . ३०) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइट व मोबाईल ॲपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्या पुण्यातील एकूण ३ लाख १४ हजार ९२० वीजग्राहकांकडे ७६ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये घरगुती २ लाख ६८ हजार १२२ ग्राहकांकडे ५३ कोटी ९१ लाख रुपये, वाणिज्यक ४३ हजार ६३८ ग्राहकांकडे २० कोटी नऊ लाख रुपये थकीत, औद्योगिक ३ हजार १६० ग्राहकांकडे २ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी तर ८ हजार ९१४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित कऱण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात एकूण १ लाख ५१ हजार ४०९ वीजग्राहकांकडे ५४ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख २५ हजार ८६९ ग्राहकांकडे ३१ कोटी ६३ लाख रुपये थकीत आहेत. वाणिज्यक २१ हजार ३५ ग्राहकांकडे १३ कोटी ४ लाख रुपये थकीत आहेत. औद्योगिक चार हजार ५०५ ग्राहकांकडे नऊ कोटी ६१ लाख रुपयांची थकबाकी असून ९५२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित कऱण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण २ लाख ४२ हजार ५६३ वीजग्राहकांकडे ७४ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख १६ हजार २६१ ग्राहकांकडे ५२ कोटी ५७ लाख रुपये, वाणिज्यक २२ हजार ५९६ ग्राहकांकडे १४ कोटी ३५ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार ७०६ ग्राहकांकडे सात कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर चार हजार २८९ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.