पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण; राहुल गांधी यांना कोर्टात हजर राहावे लागणार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी १९ ऑगस्टच्या आत न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला आहे.

संग्रहित छायाचित्र

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा आदेश

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी १९ ऑगस्टच्या आत न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत आढळलेले तथ्य आणि विश्रामबाग पोलिसांचा तपासणी अहवाल  प्रथमदर्शनी  ग्राह्य धरीत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी नुकताच तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला. त्यामध्ये राहुल  गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाणार आहे. त्यानुसार पुढील तारखेला पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन काही आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले होते. या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर पोलिसांनी आपला तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला. 

राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आल्याचे पोलिसांनी अहवालात नमूद केले आहे. आता पोलिसांच्या अहवालाच्या आधारे न्यायालयाकडून  ‘सीआरपीसी’च्या कलम २०४ नुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, त्याप्रमाणे राहुल गांधी यांना पुढील तारखेला पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, असे  सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest