पुणे शहर रेबीज मुक्त करणार, महापालिकेने तयार केला प्रस्ताव
पुणे शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची नसबंदी (PMC News) शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे शहर रेबीज मुक्त करण्याची मोहिम राबविण्यात (Pune News) येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शहरासह उपनगर भागात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक त्रासेल आहेत. भटकी कुत्रे चालवल्याने नागरिकांना जीवाला धोका निर्माण झाला आहे. भटके कुत्रे चावल्याने रेबीजच्या घटनांमध्ये होऊ शकते. त्यामुळे महापालिकेकडून पुणे शहर रेबीज मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मॉनिटरिंग कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
भटका कुत्रा चावल्याने त्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होत असते. त्यामुळे कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीज होतो की काय अशी मनात धास्ती असते. त्यासाठी रक्ताची तपासणी केली जाते. मात्र या तपासण्या महागड्या असतात. नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेकडून रेबीज मुक्तीची मोहिम आखण्यात आली आहे. त्यानुसार शहरासह महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावात देखील ही मोहित राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत भटक्या कुत्र्यांच नसबंदी तसेच त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या या मोहिमेत पाळीव कुत्र्यांच्या लसीकरणाचा विचार करण्यात आलेला नाही. मात्र कोणी पाळीव कुत्रा घेवून आल्यास त्याचेही लसीकरण करण्यात येणार आहे. यासोबतच रेबीज झालेल्या रुग्णांचा मृत्यू होणार यासाठी देखील मोहिम राबविली जाणार आहे. भटक्या कुत्र्याचे लसीकरण झाल्यानंतर त्यांचे टॅगिंग केले जाणार आहे, त्यामुळे लसीकरण झाल्याची माहिती मिळू शकणार आहे. तसेच पाळीव कुत्र्यांना क्युआर कोड देण्यात देणार आहे. यामुळे कुत्र्यांची संख्येची माहिती मिळण्यास सोपे होणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
पुणे महापालिकेच्या हद्दीत परिसर रेबीज मुक्त करण्याची मोहिम आखली जाणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. महापालिकेकडून सध्या एक रुग्णालय केशवनगर भागात चालविण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारचे एक रुग्णालय आहे. अणखी तीन रुग्णालयात उपचाराची सुविधा देण्याचा विचार करण्यात आला आहे. किमान तीन संस्थांनी महापालिकेकडे अर्ज करावा, असे आपेक्षित आहे.
- डॉ.भगवान पवार, आरोग्य विभाग प्रमुख, महापालिका.
मॉनिटरिंग कमिटीच्या सदस्यांमध्ये बदल...
भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्याच्या कामावर नियंत्रण करण्यासाठी मॉनिटरिंग कमिटी गठीत करण्यात आली होती. त्याप्रमाणे मॉनिटरिंग कमिटीच्या सदस्यांमध्ये बदल करण्याबाबत सुचविण्यात आले होते. त्यानुसार बदल करून नवीन मॉनिटरिंग कमिटी गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवीन मॉनिटरिंग कमिटी सदस्य : आयुक्त महापालिका (अध्यक्ष), आरोग्य अधिकारी (प्रतिनिधी), प्र. मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा स्तरीय प्राणी क्लेश समितीचे प्रतिनिधी
महापालिकेच्या अहवालानुसार..
- गेल्या पाच वर्षांत शहरातील रस्त्यावरील कुत्र्यांची संख्या आणि लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे
- भटक्या कुत्र्यांच्या संख्येत घट झाल्याबरोबरच कॅनाइन रेबीजच्या घटनांमध्येही लक्षणीय घट झाली आहे
- कुत्र्यांची संख्या: - 2018 मध्ये 3.15 लाख होती, ती 2023 मध्ये 1.80 लाख इतकी कमी झाली आहे. यात 42.87% ची लक्षणीय घट झाली आहे
- 2018 आणि 2020 दरम्यान दरवर्षी 200 हून अधिक प्रकरणे रेबीज बाबत नोंदवली जात होती. आता 2021 आणि 2022 दरम्यान दरवर्षी 71 पेक्षा कमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत
- नसबंदी आणि लसीकरणामुळे कुत्र्यांचे व्यवस्थापन आणि त्यांची संख्या कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांनी सल्ला दिला
महापालिका रेबीज फ्री करण्याची अशी असेल मोहिम...
- दररोज प्रत्येक संस्थेकडून १० कुत्र्यांचे नमुने रेबीज आजार तपासणीसाठी पाठविण्यात येणार
- आरोग्य अधिकारी रेबीज या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी पुणे मनपाच्या दवाखानामध्ये सीसीसी या संस्थेने जनजागृती करावी.
- रेबीज प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नव्याने फक्त लसीकरण करण्याची निविदा काढणार
- महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावामधील भटक्या व मोकाट कुत्र्यांची गणना करण्यासाठी निविदा प्रक्रिया
- भटक्या कुत्र्याच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक गाडीची नियुक्ती
- सर्व पशुवैद्यकीय दवाखान्याची नोंदणी करण्यात येणार
- भटक्या व मोकाट रस्त्यावर आजारी अथवा जखमी असलेल्या कुत्रा, मांजर व इतर जनावर याच्यावर उपचार करण्यासाठी निविदा प्रक्रिया
- खाजगी ३ संस्थेची नेमणूक करण्यात येणार