पुणे: चांदणी चौक आता सहज ओलांडता येणार!

पुणे: चांदणी चौक येथून मुंबईला जाणे आता सोपे आणि सुरक्षित होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या पादचारी पुलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. सुमारे साडे सहा कोटी रुपये खर्चून ११० मीटर लांबीचा व ६.६ मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे.

Chandni Chowk, Pune Mumbai Travelling, Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पादचारी पुलास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची मान्यता

पुणे: चांदणी चौक येथून मुंबईला जाणे आता सोपे आणि सुरक्षित होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या पादचारी पुलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. सुमारे साडे सहा कोटी रुपये खर्चून ११० मीटर लांबीचा व ६.६ मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल पाषाण ते मुंबईच्या दिशेने असलेल्या बसथांबा या दरम्यान बांधण्यात येणार आहे. या महिन्याच्या अखेरीस या पुलाच्या बांधकामास सुरुवात होईल.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे ८६५ कोटी रुपये खर्चून चांदणी चौकात आठ रॅम्पसह मुख्य रस्ता अधिक मोठा केला. परिणामी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला. चांदणी चौकात रस्त्याचे काम होण्यापूर्वी रोज या रस्त्यावरून सुमारे ३० ते ३२ हजार वाहनचालक प्रवास करीत होते. आता याची क्षमता वाढली आहे. रोज साधारणपणे दीड लाख वाहने या रस्त्यावरून सहजरित्या धावू शकतील, अशी रस्त्याची क्षमता झाली आहे. मात्र, पादचाऱ्यांना मुंबईला जाणारी बस पकडण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडून बस थांब्याजवळ यावे लागत होते. यात अपघाताचा मोठा धोका होता. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पादचारी पुलाचा प्रस्ताव सहा ते सात महिन्यांपूर्वी मुख्यालयाकडे पाठवला होता. त्याला आता मंजुरी मिळाली असून त्याच्या निविदेची  प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्टअखेरीस पुलाच्या कामाला सुरुवात होईल. साधारणपणे तीन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची आशा आहे. यामुळे पादचाऱ्यांना बसथांब्याकडे जाताना रस्ता ओलांडून जाण्याची गरज नाही. ते पुलावरून सुरक्षित पणे जाऊ शकतील.

पादचारी पुलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्यात आहे. ऑगस्टअखेरीस पायाभरणीस सुरिवात होईल. पूल लवकर बांधून तयार व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे.
- अंकित यादव, उप व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest