निरा देवघर धरणात कार कोसळली, तीन जण बेपत्ता
पुणे जिल्ह्यातील भोर - महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव गावच्या हद्दीत एक मोटार निरा देवघर धरणाच्या पाण्यात पडली. आज पहाटे ही दुर्घटना घडली. मोटारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण होते. त्यापैकी एक जण बचावला असून तिघेजण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघात ग्रस्त हे पुण्यातील रावेर येथील असल्याचे समजते. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी रवाना झालेले आहेत.
दरम्यान, पुण्यातील अनेक परिसरात सध्या दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुणे-रायगड जिल्ह्याला जोडणारा वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पण त्यानंतरही काही नागरीक स्वतःचा जीव धोक्यात घालून या मार्गाने प्रवास करत आहे. हाच प्रयत्न शनिवारी ३ प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे. हे प्रवासी रावेतमधील असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील प्रवासी पुण्याहून वरंधा घाटमार्गे कोकणाकडे निघाले असावे, असा अंदाज आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.