राणेंविरोधात रास्ता रोको आंदोलन, तृतीयपंथीयांची पोलीसांकडून धरपकड
भाजप आमदार नितेश राणे यांनी तृतीयपंथीयांबाबत आक्षेपार्ह ट्वीट केले होते. राणेंच्या ट्वीटनंतर तृतीयपंथी आक्रमक होत आंदोलन केले आहे. लोकप्रतिनिधी असताना देखील अशा प्रकारचे वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यातील नवी पेठ पोलीस चौकीत गुन्हा दाखल करणार असल्याचे मंगळवारी तृतीयपंथीयांकडून सागण्यात आले होते. मात्र, गुन्हा दाखल न झाल्यामुळे तृतीयपंथी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे रास्ता रोको करण्यात येत असलेल्या तृतीयपंथीयांचे पोलीसांकडून धरपकड करण्यात येत आहे.
आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना 'हे बघा हिजड्यांचे सरदार,' असे वक्तव्य केले होते. त्यामुळे, राणे यांच्याविरोधात मध्यरात्रीपासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीयपंथी समाजाच्यावतीने रास्ता रोको करत आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडून नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत नाहीये.
पण जोपर्यंत नितेश राणे यांच्यावर पुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीने आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका यावेळी तृतीयपंथीयांनी घेतली आहे. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. रास्ता रोको करणाऱ्या तृतीयपंथीयांची पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे. यावेळी मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.