Accident : मंतरवाडी चौकात मालवाहू ट्रक उलटला
पुण्यातील मंतरवाडी चौकात मालवाहू ट्रक उलटून मोठा अपघात झाला आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घडला आहे. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक हांडेवाडीतून मंतरवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी मंतरवाडी चौकात आला असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक डिव्हायडरला धडकला. त्यामुळे ट्रक पलटली होऊन अपघात झाला. या अपघातात गाडीतील चालक कॅबिनमध्ये अडकला होता.
घटनेची माहिती मिळातच कर्तव्यावर असणाऱ्या हांडेवाडी वाहतूक विभागातील पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तात्काळ कॅबिनचा पत्रा काढून चालकाची सुखरूप सुटका केली. या मालवाहू ट्रकमध्ये एक दुकाची देखील होती. मात्र, अपघातामुळे दुचाकीसह ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.