इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू
वृध्द महिला इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घठना पुण्यातील शनिवार पेठ परिसरात आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास घडली आहे.
विजया दुदाठे (वय ७६) असे मृत्यू झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या ६ व्या मजल्यावर मंदिर आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे विजया इमारतीवर सहाव्या मजल्यावर असलेल्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या.
मात्र, खाली उतरताना त्यांना अचानक चक्कर आली. चक्कर आल्यामुळे त्या खाली कोसळल्या. या दुर्घटनेत विजया यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, यावेळी विजया या आजारी असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय त्यांना सातत्याने चक्करही येत असल्याचे सांगण्यात येत आहे. आज देखील चक्कर आल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.