पुण्यातील प्राची देबनी मोडला स्वतःचाच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड
आयसिंग केक कलाकार प्राची धबल यांनी या आधी १०० किलोचा मिलान साकारला होता. यावेळी देखील त्यांनी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी २०० किलो वजनाचा वेगन रॉयल सिंग केक बनवला आहे आणि स्वतःचा जुना रेकॉर्ड तोडला आहे.
पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, त्यामुळे इथे राजवाड्यांना देखील मोठा इतिहास आहे. हीच बाब लक्षात घेत प्राची यांनी रॉयल आयसिंगच्या माध्यमातून भारतीय रचना शास्त्रावर आधारित एका भव्य राजवाड्याची रचना करून रॉयल आयसिंग केक तयार केला आहे. हा केक तब्बल १० फूट लांब ४.७ फूट उंच आणि २०० किलो इतक्या वजनाचा आहे. आता त्यांनी केलेल्या या विक्रमाची नोंद लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने नोंदविली आहे.
पुणे शहरातील राजवाड्यांचे इतिहास यांना एक वेगळे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मी राजवाड्याची प्रतिकृती साकारली आहे. आपण पाहिले तर सर्वसाधारण रॉयल आयसिंग केक हा केवळ नाजूक पायपिंगसाठी केला जातो. पण मी गेली अनेक वर्ष रॉयल आयसिंगद्वारे मोठ्या वजनाचे आणि मजबूत केक तयार करत आहे. या केकमध्ये देखील दोन हजार हून अधिक छोटे मोठे वस्तू वापरल्या आहेत. हा माझा तिसरा रेकॉर्ड असल्याचा देखील प्राची धबल यांनी यावेळी सांगितले आहे.