मनोरुग्णालयात पदव्युत्तर मानसोपचार अभ्यासक्रम होणार सुरू
येरवडा : येरवडा (Yerwada) प्रादेशिक मनोरूग्णालयात (Psychiatric Hospital) पदव्युत्तर मानसोपचार, परिचारिका चिकित्सालयातीन मानसशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. तर पदव्युत्तर मानसोपचार व मानसशास्त्रीय समाजसेवक हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षांपासुन सुरू होणार आहेत. (Pune News) दिवसेंदिवस मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा अभ्यासक्रमांमुळे याक्षेत्रातील मनुष्यबळांची गरज भागणार असल्याची माहिती येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुनिल पाटील यांनी दिली. (Pune City News)
येरवडा मनोरूग्णालयातील रुग्ण संख्या २५४० असून सध्या याठिकाणी नऊशे पुरूष व सहाशे महिला रुग्ण उपचार घेत आहेत. नवीन अभ्यासक्रमाची आवश्यकते संदर्भात डॉ. पाटील म्हणाले, ‘‘ रुग्णालयातील रुग्णसंख्या पाहता याठिकाणी पदव्युत्तर मानसोपचाराचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आरोग्यविभागाने घेतला होता. मानसिक आजारांच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने केंद्राकडे पदविका व प्रमापणत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली होती. केंद्र सरकारने तीन विषयांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार केलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या कर्वे सामाजिक संस्थेच्या वतीने मानसशास्त्रीय समाजसेवक, परिचारिका चिकित्सालय मानसशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. त्त्यापैकी परिचारिका चिकित्सालय हा अभ्यासक्रम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले आहे. राज्य आणि केंद्राच्या मेडिकल कॉन्सिलची पाहणी झाल्यानंतर पदव्युत्तर मानसोपचार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
मनोरूग्णालयात रुग्णाला दाखल केल्यानंतर रुग्णांची मानसिक व शारिरीक चाचणी केली जाते. येथे रुग्णाला शॉक ट्रिटमेंट दिले जाते. त्यापूर्व रुग्णाची रक्त तपासणी,एक्सरे, ईसीजी आदी वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. त्यानंतरच भुल देऊन शॉक ट्रिटमेंटचा उपचार सुरू करतात. या ठिकाणी प्रत्येकी एक इलेक्ट्रोथेरपीस्ट, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी आहेत. रुग्णांचा आजार किती दिर्घ आहे, त्यांची शारीरिक व मानसिक स्थितीवरून त्यांना फिट, अशक्त किंवा सर्वसाधारण कक्षात उपचारासाठी ठेवले जाते. त्यामुळे याठिकाणी मानसोपचार अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अधिक सोईचे व फायद्याचे ठरणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुनिल पाटील म्हणाले की, “ येरवडा मनोरूग्णालयात पुढील वर्षापासून एमफील सायकॅट्रीक सोशल वर्कर, डिप्लोमा इन क्लिनिकल सायकॅट्रीक नर्स हे कोर्स सुरू होणार आहेत. त्यानंतर एमडी सायकॅट्रिक अभ्यासक्रम सुरू होणार आहे.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.