पुण्यातही राजकीय नेत्यांना बंदी, मराठा क्रांती मोर्चाची भूमिका
मोना येनपुरे
मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) सरकारला दिलेली ४० दिवसाची मुदत संपल्याने मनोज जरांगे पाटील (Jarange Patil) यांनी आजपासून आमरण (Maratha community) उपोषणाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन पाठिंबा सुद्धा देत आहे. पुण्यात देखील मराठा क्रांती मोर्चा मनोज जारांगे (Maratha Kranti Morcha) यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी सांगितलेल्या तिन्ही प्रकारचा आंदोलन आम्ही करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलेला आहे.
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहासमोर हे साखळी उपोषण मराठा समाज बांधवांनी सुरू केले आहे. त्याचबरोबर २८ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजीनगर ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा डेक्कन इथपर्यंत कॅण्डल मार्च करण्यात येणार आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देणे शक्य आहे बापट आयोगामधील काही सदस्याने ती आकडेवारी सांगितलेली आहे सरकार वेळ खाऊपणा करत आहे सरकारला द्यायची इच्छा नाही त्यामुळे हे सगळं होत असल्याची प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कुंजीर यांनी दिली असून सरकारने संवाद साधून यातून मार्ग काढून ओबीसीसी संवाद साधून मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे आणि त्यासाठी जो आमचा लढा सुरू आहे तो सुरूच राहील आम्ही अगदी शांतता मार्गाने मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि उद्यापासून पुणे जिल्ह्यात सुद्धा मराठा क्रांती मोर्चा चे आंदोलन उभे राहणार असल्याचे म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.