PMPML : पीएमपीची एका दिवसात दोन कोटींची कमाई, विविध मार्गावर धावल्या १,६९८ बस

पुणे शहराची जीवन वाहिनी असलेल्या पीएमपी बसचे प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. या प्रयत्नांना यश आले असून पीएमपीला एकाच दिवसात तब्बल दोन कोटी ६ लाख ३१ हजार ९४५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

PMPML : पीएमपीची एका दिवसात दोन कोटींची कमाई, विविध मार्गावर धावल्या १,६९८ बस

पीएमपीची एका दिवसात दोन कोटींची कमाई, विविध मार्गावर धावल्या १,६९८ बस

२० नोव्हेंबर रोजी तब्बल १२ लाख २३ हजार प्रवाशांनी केला प्रवास

पुणे : पुणे शहराची जीवन वाहिनी असलेल्या पीएमपी बसचे (PMPML Bus) प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. या प्रयत्नांना यश आले असून पीएमपीला एकाच दिवसात तब्बल दोन कोटी ६ लाख ३१ हजार ९४५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपी), पिंपरी चिंचवड शहर व त्यालगतच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात प्रवाशांकरीता बससेवा पुरविण्यात येते. दिपावली सुट्टी संपत असल्याने परगांवी गेलेले प्रवासी परतत असल्याने मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये व प्रवाशांना सुरक्षित उत्तम दर्जाची तत्पर बससेवा पीएमपीकडून दिली जात आहे. त्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी सर्व अधिकारी यांना परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्ण क्षमतेने व सर्व नियोजीत शेड्युल मार्गस्थ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच महत्वाच्या बसस्थानकावर बससंचलनावर नियंत्रणासाठी व प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आगार व्यवस्थापकांच्या नेमणूका करण्यात आल्या होत्या.

वाहतूक कोंडीचा विचार करता पीएमपीएमएल च्या ताफ्यात असणाऱ्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा वापर शहरवासियांनी व शहरात येणाऱ्या प्रवाशांनी वाढविला आहे. सोमवार (ता. २०) रोजी मार्गावर १६९८ बसेस संचलनात होत्या. तर  जास्त उत्पन्नाच्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिवहन महामंडळास रक्कम रूपये २ कोटी ६ लाख ३१ हजार ९४५ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर १२ लाख २३ हजार ८७ इतक्या प्रवाशांनी प्रवास केला.

मजूर, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. त्याचबरोबर शहरातील शाळा व कॉलेज पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. दैनंदिन प्रवाशी संख्या व दैनंदिन उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही प्रवाशांनी पीएमपीच्या बससेवेवर दाखविलेला विश्वास आहे. प्रवाशांनी पीएमपीच्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.

हडपसर रेल्वे टर्मिनलवरुन पीएमपी बसीची मागणी कायम...

हडपसर रेल्वे स्थानकातून हैदराबाद रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. ही रेल्वा लातून जिल्ह्यातून जाते. त्यामुळे या रेल्वेला परराज्यातील नागरिकांसह राज्यातील प्रवाशांची संख्या मोठी असते. आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे काझीपेठ, हैद्राबाद, लातूर या मार्गे येणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे बाराशेच्या जवळपास आहे.  हडपसर रेल्वे टर्मिनलवरुन पीएमपीच्या केवळ दोनच बस आहेत. ही संख्या आपुरी असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. खासगी वाहनधारक या प्रवाशांची लूट करीत आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवाशांची संख्या विचारात घेता आधिक संख्येने वेळेचे नियोजन करुन बससेवा सुरु करावी, अशी मागणी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest